Chinchwad Crime : एका आठवड्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवली. एका आठवड्याच्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांनी तब्बल 5 हजार 107 वाहनांवर कारवाई केली आहे. या वाहन चालकांवर 35 लाख 47 हजार 300 रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी 4 ते 11 नोव्हेंबर या आठवड्यात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोहीम राबवली. शहरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. सण-उत्सवांच्या कालावधीत अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या मूडमध्ये असतात. त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.

उल्लंघनाचा प्रकार (केसेस) – दंडाची रक्कम

ओव्हर स्पीड (560) – 5 लाख 60 हजार
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे (1451) – 14 लाख 51 हजार
लेन कटिंग (48) – 10 हजार
मोबाईल टॉकिंग (476) – 1 लाख 29 हजार 100
डेंजरस ड्रायव्हिंग (694) – 6 लाख 94 हजार 500
लाल सिग्नल जम्पिंग (637) – 1 लाख 64 हजार 700
विना हेल्मेट (696) – 3 लाख 85 हजार 700
विना सीटबेल्ट (545) – 1 लाख 52 हजार 300

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.