Chinchwad: महिलेचा पाठलाग करून शिवीगाळ करणार्‍या तरूणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – क्लासला जाणार्‍या महिलेचा पाठलाग करून शिवीगाळ करणार्‍या तरूणावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27) रोजी सायंकाळी पावणेसात वाजता चिंचवड येथील गणेश कॉलनी येथे घडली.

सोन्या लांडगे (रा. निंबाळकर चाळ, पागेची तालीम, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शुक्रवारी सायंकाळी क्लासला जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.