Chinchwad : गार्डनमधील कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – गार्डनमध्ये गोंधळ घालणाऱ्या दोघांना गार्डनमधील कर्मचाऱ्याने रोखले. यावरून गोंधळ घालणाऱ्या दोघांनी कर्मचाऱ्यास मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. 3) दुपारी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास केजुबाई बोट क्लब जवळ थेरगाव येथे घडला.
प्रसाद पूजार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), त्याचा मावस भाऊ सिद्धू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय परशुराम बारणे (वय 43, रा. थेरगाव वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय केजुबाई बोट क्लब जवळ असलेल्या उद्यानात काम करतात. रविवारी दुपारी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास आरोपी उद्यानामध्ये गोंधळ घालत होते. याचा इतरांना त्रास होऊ नये. यासाठी संजय यांनी गोंधळ घालणा-या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. या कारणावरून आरोपींनी संजय यांना शिवीगाळ करत दगडाने मारले. यामध्ये संजय जखमी झाले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.