Chinchwad : गुन्हे शाखेकडून 57 लिटर हातभट्टीची दारु जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उद्यमनगर झोपडपट्टी येथे छापा मारून पाच हजार 700 रुपये किमतीची 57 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस शिपाई अजित कुटे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारत शिवराम कुदळे (वय 55, रा. उद्यमनगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने, आस्थापने, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, वाईनशॉप, बिअरशॉप, देशीदारू, किरकोळ विक्री केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही उद्यमनगर झोपडपट्टी येथे एकजण बेकायदेशीररित्या दारूची विक्री करीत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून एका पत्र्याच्या शेडवर छापा मारला. त्यावेळी पोलिसांना पाच हजार 700 रुपये किमतीची 57 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली. आरोपी भारत कुदळे हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like