Chinchwad Crime : माजी नगरसेवकाच्या कारचा अपहार

मुलाच्या वाढदिवसाला बाहेर जाण्यासाठी म्हणून नेलेली कार परत केलीच नाही

एमपीसी न्यूज – मुलाच्या वाढदिवसासाठी बाहेर जाण्यासाठी माजी नगरसेवक असलेल्या मित्राची कार दोन दिवसांसाठी नेली. साडेतीन महिन्यानंतर देखील कार परत न करता कारमालक माजी नगरसेवक मित्राची फसवणूक केली. हा प्रकार 12 जुलै 2020 रोजी लिंक रोड, चिंचवड येथे घडला.

काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश नारायण लोंढे (वय 43, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक खरात (रा. किवळे रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे यांच्याकडे इनोव्हा क्रिस्टा (एम एच 14 / जी वाय 4113) ही कार आहे. 12 जुलै 2020 रोजी आरोपी खरात आणि त्याचा मित्र सागर कांबळे याने खरात याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी बाहेर जाण्याचे कारण सांगून दोन दिवसांसाठी लोंढे यांची कार नेली. ती कार अद्यापही खरात याने लोंढे यांना परत केली नाही.

लोंढे यांनी कार मागितली असता खरात याने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांचा विश्वासघात व फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.