Chinchwad Crime : तरुणास मारहाण प्रकरणी सराईत गुन्हेगारासह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विनाकारण एका सराईत गुन्हेगार आणि त्याच्या तीन साथीदारांनी तरुणास लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. ही घटना आनंदनगर, चिंचवड स्टेशन येथे 13 नोव्हेंबर रोजी घडली.

पवन लष्करे (रा. रामनगर, चिंचवड) आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. धनंजय रमेश पल्ले (वय 22, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) यांनी बुधवारी (दि. 18) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास फिर्यादी पल्ले हे आनंदनगर परिसरात उभे होते. त्यावेळी आरोपी पवन लष्करे हा आपल्या साथीदारांसह तिथे आला. काहीही कारण नसताना त्याने फिर्यादी पल्ले यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. या मारहाणीत पल्ले हे गंभीर जखमी झाले आहेत.

आरोपी पवन लष्करे यांच्यावर तब्बल सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक तपास सहायक निरीक्षक राजू ठुबल करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.