Chinchwad Crime : गाडी फास्ट चालवून स्टंट मारतो का? विचारत दोघांना मारहाण; एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – ‘तू भीमनगरमध्ये गाडी फास्ट चालवून स्टंट मारतो का, असे विचारत (Chinchwad Crime) दोघांना मारहाण करण्यात आली. तसेच, एकाच्या डोक्यात वार देखील करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6 मे) रात्री सव्वा अकरा वाजता भीमनगर, चिंचवड येथे घडली.

ओमकार उर्फ आनंद ओव्हाळ (वय 24, रा. भीमनगर, चिंचवड) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत रवींद्र रामदास लोंढे (वय 29, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad News : शस्त्र बाळगल्याचे एकाच दिवशी आठ गुन्हे दाखल; आठ जणांना अटक

पोलिसांनी (Chinchwad Crime) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांचा मित्र धीरज धिनेश लिंगवत (रा. मोदीखाना कॅम्प, पुणे) हे दोघेजण भीमनगर चिंचवड येथील एका बारमधून पाण्याची बाटली घेऊन घरी जात होते. त्यावेळी त्यांचा मित्र आरोपी हेमंत तिथे आला. त्याने फिर्यादी यांना आवाज देऊन त्याच्याकडे बोलावले. फिर्यादी त्याच्याजवळ गेले असता, ‘तू भीमनगरमध्ये गाडी फास्ट चालवून स्टंट मारतो का? असे विचारत शिवीगाळ करत ‘तू इथेच थांब तुला दाखवतो’ असे म्हणून तिथून निघून गेला.

Maval News : पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; व्यसन करण्यासाठी करायचा पत्नीकडे पैशांची मागणी

त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचा मित्र घरी जात होते. आरोपी पाठीमागून आला. त्याने फिर्यादी यांना उलट्या कोयत्याने मारले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा मित्र धीरज हा आला असता, त्याच्या डोक्यात कोयत्याने मारून आरोपीने त्याला जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.