Chinchwad Crime : वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने घातला 90 हजार रुपयांचा गंडा

एमपीसी न्यूज – वीजबिल अपडेट करण्याचा (Chinchwad Crime) बहाणा करून वृद्ध व्यक्तीला मोबाईलमध्ये क्विक सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्याद्वारे बँक खात्याची गोपिनीय माहिती चोरून वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून 90 हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी चिंचवड येथे घडली.

वी. कृष्णमूर्ती (वय 73, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 2) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी कृष्णमूर्ती यांना फोन करून फोनवरील व्यक्ती एमएसईबी कार्यालयातून बोलत असल्याचा बहाणा केला. कृष्णमूर्ती यांचे वीजबिल अपडेट करून देण्याचा बहाणा करून त्यांना क्वीक सपोर्ट नावाचे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे कृष्णमूर्ती आणि त्यांच्या पत्नी यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून 90 हजार 510 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Pimpri News: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

दरम्यान, महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे की, बिलांचा सुरक्षित भरणा (Chinchwad Crime) करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व www.mahadiscom.in ही वेबसाईट उपलब्ध आहे. महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे एसएमएस’ व व्हॉटस् ॲप’ मेसेज पाठविण्यात येत नाही. तर ज्या ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, केवळ त्याच वीजग्राहकांना संगणकीय प्रणालीद्वारे एसएमएस’ पाठविण्यात येतात.

या संदेशाचे सेंडर आयडी (Sender ID) हे VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असे आहेत. तसेच, या अधिकृत संदेशाद्वारे वीजग्राहकांना कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही. बँकेचा ओटीपी शेअर करण्याबाबत किंवा कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. सोबतच वैयक्तिक क्रमांकावरून व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविले जात नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.