Chinchwad : फेसबुकवरुन आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज – फेसबुकवरुन मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 7) चिंचवडगाव येेथे घडली.

पराग पुरुषोत्तम जोशी (वय 40, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या

नुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने फिर्यादी पराग यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून ‘एक करोड मराठ्यांचा ग्रुप’, जो एक मराठा अॅड होईल त्याने 100 अॅड करावे’ या फेसबुक ग्रुपवर दिनेश सूर्यवंशी यांच्या फेसबुक अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेज पोस्ट केला. ‘दोन-चार कार्ट्यांवर गोळ्या झाडल्यावर एकही कार्ट गडाजवळ थांबणार नाही. मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही फक्त निर्णय मागे घेऊ नका.’ ही आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट केली.

तसेच ही पोस्ट राकेश कोते-पाटील या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून सुद्धा शेअर करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. याबाबत अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like