Chinchwad Crime : चाकण, मोशी, वाकड मधून दोन लाखांच्या चार दुचाकी चोरीला

अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – चाकण, मोशी आणि वाकड परिसरातून दोन लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 15) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुटकेवाडी चाकण भाजी मार्केट येथील श्रद्धा हॉस्पिटलसमोर पार्क केलेली 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एच ए 5373) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 13 सप्टेंबर रोजी रात्री दहा ते 14 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजताच्या कालावधीत घडला. याप्रकरणी सुखलाल धनाजी नट (वय 28, रा. मुटकेवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_PDL_ART_BTF

पुणे-नाशिक रोडवर मोशी येथून 60 हजार रुपये किमतीची एक पल्सर दुचाकी (एम एच 14 / जे बी 5246) अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 13 जुलै रोजी घडली असून याबाबत 15 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरज वासुदेव बोदडे (वय 27, रा. तळेगाव चौक, चाकण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बोदडे यांनी सुरुवातीला त्यांच्या दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकीचा शोध न लागल्याने त्यांनी दोन महिन्यांनी गुन्हा नोंदवला आहे.

वाकड रोड, वाकड येथील सम्राट चौकातून 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या कालावधीत अज्ञातांनी एक लाख रुपये किमतीची बुलेट (एम एच 14 / जी झेड 0584) चोरी केली. याप्रकरणी फिरोज इस्लाम शेख (वय 30, रा. गुरुनानक नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात आणखी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माधव प्रकाश खोसरे (वय 27, रा. वाकड रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. खोसरे यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एम एच 28 / ए के 1020) 14 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 15 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता उघडकीस आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.