Chinchwad Crime : निगडी, चाकण, सांगवी, तळेगाव मधून चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – वाहने चोरीला जाणे ही नित्याची बाब झाली आहे. वाहनचोरांनी शहरात हैदोस घातला आहे. हे वाहनचोर पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी (दि. 10) निगडी, चाकण, सांगवी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चार वाहन चोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात विशाल संपत गायकवाड (वय 38, रा. प्राधिकरण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते 6 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत फिर्यादी गायकवाड यांनी त्यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी एच 9045) त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात संतोष आबासाहेब हांगे (वय 21, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. हांगे यांची 70 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / जे बी 2854) अज्ञात चोरट्यांनी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता निघोजे येथील महिंद्रा कंपनीच्या गेट समोरील पार्किंगमधून चोरून नेली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

सांगवी पोलीस ठाण्यात प्रकाश बापू कुरुंद (वय 24, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. कुरुंद यांची 90 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पिंपळे सौदागर येथील गणेशम बिल्डींगच्या पार्किंग मधून चोरून नेली. ही घटना 30 सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दत्तात्रय विठोबा भागवत (वय 45, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. भागवत यांची 10 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 9 ऑक्टोबर रात्री साडेसात ते 10 ऑक्टोबर सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.