Chinchwad Crime : कर्जाचे आमिष दाखवत चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने एकाची चार लाखांची फसणूक केली आहे. ही घटना 30 सप्टेंबर 2020 ते 27 सप्टेंबर 2021 या कालावधीत चिंचवड (Chinchwad Crime) येथे घडली.

डॉ. विकास अझित एच (वय 50, रा. पाषाण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोलन मुदलियार, जयशंकर (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bank cheque fraud : बँकेचे कोरे धनादेश घेऊन अडीच लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिंचवड येथे (Chinchwad Crime) अवनीरा बायोटेक ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचा व्यवसाय वाढीसाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी कर्ज मिळण्याबाबत चाचपणी केली. त्यावेळी आरोपींनी त्यांना कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे आश्वासन दिले. कर्ज मंजूर करून देण्यासाठी फिर्यादींकडून चार लाख रुपये घेऊन कर्ज मंजूर करून न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.