Chinchwad Crime : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याच्या रागातून पती-पत्नीला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – खूनाच्या गुन्ह्यात अटक झाल्याने खून झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना शिक्षा झालेल्या दोघांनी मिळून दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 9) सकाळी पावणेदहा वाजता दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

विलास भगुजी कांबळे (वय 52, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रामचंद्र कुसाळकर, सुभाष कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांच्या मुलाच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी रामचंद्र आणि सुभाष यांना शिक्षा झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी फिर्यादी यांच्या मासे विक्रीच्या दुकानावर आले. दुकानावर फिर्यादी आणि त्यांचा पत्नी बसल्या होत्या. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.