Chinchwad Crime : सराईत गुन्हेगार मंगेश मोरे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज – आर्थिक फायद्यासाठी तसेच वर्चस्वासाठी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार मंगेश मोरे आणि त्याच्या नऊ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या टोळीने वर्चस्ववादातून एका तरुणाचा खून केला होता.

टोळी प्रमुख मंगेश शुक्राचार्य मोरे (वय 23, रा. कृष्णापार्क, गव्हाणे पेट्रोल पंपामागे, भोसरी पुणे), रोशन हरी सायडतकर (वय 21, रा. भोसरी, पुणे), अमित सुभाष शेकापुरे (लाडु) (वय 21, रा. चक्रपाणी रोड, जुन्या पोस्ट ऑफिस मागे भोसरी, पुणे), शुभम अजय वानखेडे (वय 20, रा. अशोकनगर, भवानी पेठ, पुणे), प्रणेश चंद्रकांत घोरपडे (वय 22, रा. दिघी, पुणे), शुभम बलराम वाणी (वय 22, रा. दिघी पुणे), वैभव तानाजी ढोरे (वय 21, रा. अशोकनगर, भवानीपेठ, पुणे), अभिजित ऊर्फ माया गणेश गांगले (वय 22, रा. विवेकानंद चौक, शाहुनगर, लातुर), ओम अशोकराव मठपती (वय 22, रा. सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर नं. 11, डी ब्लॉक, लातुर), निखील राजकुमार ढाबळे (वय 23, रा. सावंतनगर, दिघी, पुणे) अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. मंगेश मोरे आणि त्याच्या साथीदारांनी भोसरी येथे एका तरुणाचा टोळीच्या वर्चस्वासाठी ऑगस्ट महिन्यात खून केला होता.

आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव पाठवला.

उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी त्या प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून हा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठवला. अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. 30) मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील, डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, शंकर आवताडे, उपनिरीक्षक गाढवे, पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.