Chinchwad Crime News : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर वार

एमपीसी न्यूज – भाजपचे माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांचे पुत्र प्रशांत आगज्ञान (वय 45) यांच्यावर एकाने शस्त्राने वार केले. (Chinchwad Crime News ) ही घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली. एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून हा प्रकार झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रशांत आगज्ञान आणि संशयित आरोपी सूरज तिकोने यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी (दि. 7) किरकोळ कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्याचा राग सूरज याच्या मनात होता. रविवारी सायंकाळी प्रशांत हे मित्रांसोबत गप्पा मारत थांबले असताना एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सूरज याने धारदार शस्त्राने प्रशांतवर वार केले.

PCMC Police : स्थानिक पोलीस दखल घेत नाहीत, तर थेट पोलीस आयुक्तांच्या व्हाट्सअपवर करा तक्रार

त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमी प्रशांत हे भाजपचे माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांचा मुलगा आहे. तेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Crime News) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.