Chinchwad crime News : रिक्षाचालकाच्या पोटात घातली फुटलेली बिअरची बाटली

एमपीसी न्यूज – रिक्षा चालकाच्या पोटात विनाकारण फुटलेली बिअरची बाटली मारली. यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मोरया हाऊसिंग सोसायटी, चिंचवड येथे घडला आहे.

हुसेन अल्लाउद्दीन मुल्ला (वय 34, रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, चिंचवड) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबत त्यांनी बुधवारी (दि. 11) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी मिट्टू हुसेन बागवान (वय 34, रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बागवान याने दारू पिऊन फिर्यादी मुल्ला यांना विनाकारण शिवीगाळ केली. तसेच त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मुल्ला यांच्या पोटात बियरची बाटली मारली. यामध्ये मुल्ला गंभीर जखमी झाले आहेत.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.