Chinchwad Crime News : इमारतीच्या स्टोअर रूममधून दीड लाखाचे केबलचे बंडल चोरीला

एमपीसी न्यूज – इमारतीच्या स्टोअर रूममधून चोरट्यांनी एक लाख 59 हजार 120 रुपये किमतीचे केबल वायरचे बंडल चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी पवार बिल्डींग, मोहननगर येथे उघडकीस आली.

श्रद्धेश जयप्रकाश पवार (वय 24, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 13) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगरमधील पवार बिल्डींगच्या स्टोअर रूममध्ये फिर्यादी यांनी एक लाख 59 हजार 120 रुपये किमतीचे सहा केबल बंडल ठेवले होते. रविवारी रात्री दहा ते सोमवारी सकाळी सहा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी स्टोअर रूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून स्टोअर रूममध्ये प्रवेश केला. रूममधून केबलचे बंडल चोरट्यांनी चोरून नेले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.