Chinchwad crime News : प्राधिकरणाच्या जागेवर अवैधरित्या बांधकाम केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – प्राधिकरणाच्या जागेवर अवैधरीत्या बांधकाम केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एका जागेवर हे बांधकाम करण्यात आले.

सैयद अब्दुल रहमान सैयद तहसीन अब्दुल रौफ (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एका जागेवर आरोपीने अनधिकृतरित्या बांधकाम केले. त्या बांधकामासाठी प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी घेतली नाही.

याबाबत प्राधिकरणाकडून आरोपीला नोटीस देण्यात आली होती. मात्र, आरोपीने बांधकाम न हटवल्याने प्राधिकरणाकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.