Chinchwad Crime News : पपलु रम्मी जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पैसे लावून पपलु रम्मी जुगार खेळणा-या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे गुरुवारी (दि. 25) ही कारवाई केली.

इरशाद शब्बीर सय्यद, माधव पांडुरंग तोत्रे, अंकुश रामचंद्र कानडी, राजू मसा वाघमारे, संतोष शामराव भोसले, हनुमंत नरसप्पा पल्ले, संतोष बाबू कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलीस हवालदार संतोष बर्गे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर झोपडपट्टी लगत चिंचवड येथे आरोपी आर्थिक फायद्यासाठी पैसे लावून पपलु रम्मी नावाचा जुगार खेळत होते. त्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात 41 हजार 40 रुपयांची रोख रक्कम आणि 80 रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 41 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.