Chinchwad Crime News : कोरोना काळात नियमभंग करणाऱ्यांकडून दोन कोटी 39 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – कोरोना काळात मास्क न वापरणे, मर्यादेपेक्षा अधिक वेळ दुकाने सुरु ठेवणे तसेच अन्य नियम न पाळणा-यांवर पोलीस कारवाई करीत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोरोना काळात विनामास्क आणि अन्य कारवायांमध्ये तब्बल दोन कोटी 39 लाख 68 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी नियमांचे पालन होणे गरजेचे असल्याने प्रशासनाकडून मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे अशा सूचना केल्या जात आहेत. दुकानांच्या वेळा देखील ठरवून दिल्या आहेत. तसेच दुकानांच्या समोर गर्दी झाल्यास, कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त आठ पथके हॉटेल, दुकाने आणि इतर आस्थापनांवर कारवाई करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास देखील पोलीस आणि महापालिका प्रशासनकडून कारवाई केली जात असल्याचेही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणा-यांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे खटले देखील नोंदवले जात आहेत. आतापर्यंत 11 हजार 908 खटले दाखल करण्यात आले आहेत. 33 हजार 84 जणांवर विनामास्कची तर एक लाख 29 हजार 957 जणांवर इतर उल्लंघनाबाबत कारवाई करण्यात आली आहे.

सर्व कारवायांमध्ये एकूण दोन लाख 39 हजार 68 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.