Chinchwad Crime News : कंपनीतील सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – भ्रष्टाचार लपविण्यासाठी तरुणाला वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुप आप्पासाहेब उदगावे (वय 38, रा. मिरजगाव, ता. मिरज, जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रमोद मेमन, गुंडेपल्ली राधाकृष्ण, गणेश डोंगरे, अरविंद चौगुले, श्रीधर रामलिंगम, आदर्श सहाय, भोगशेट्टी हरीहरा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

किशोर आप्पासाहेब उदगावे (वय 41, रा. सांगली) यांनी सोमवारी (दि. 22) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना 2016 ते 20 मार्च 2021 या कालावधीत थायसन क्रृप इंडिया प्रा. लि. पिंपरी आणि पोलाइट हर्मिटेज कंपनी शिवतेजनगर, चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कंपनीत भ्रष्टाचार करतात हे मयत अनुप यांना माहिती होते. त्यांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी आरोपींनी आपसांत संगनमत करून मयत अनुप यांना त्रास देण्यास सुरवात केली. त्यांनी अनुप यांना जाणीवपूर्वक ऑफिसच्या दूरदूरच्या साइटवर पाठवले.

अनुप गावी गेले असताना कामावर परत येण्यासाठी आरोपींना फोन केला असता ते जाणीवपूर्वक फोन उचलत नव्हते. सर्वजण मिळून अनुप यांच्या कामात अडथळा आणत होते. या त्रासाला कंटाळून अनुप याने 20 मार्च 2021 रोजी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.