Chinchwad crime News : शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 102 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 102 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 23) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात 835 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. तर बुधवारी दिवसभरात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 5 हजार 197 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाने शहर पोलीस दलाला देखील वेढा दिला आहे. शहर पोलीस दलातील तब्बल 16 टक्के पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, नागरिक या आदेशांना पायदळी तुडवत आहेत. आदेशाची पायमल्ली करणा-यांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

 पोलिसांनी बुधवारी केलेली कारवाई

एमआयडीसी भोसरी (1), भोसरी (4), पिंपरी (26), चिंचवड (3), निगडी (8), आळंदी (0), चाकण (1), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (18), वाकड (13), हिंजवडी (7), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली (13), रावेत चौकी (2), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.