Chinchwad crime News : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 169 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी (दि. 6) 169 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्या विरोधात खटले नोंदवण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाईची मोहीम सुरु आहे. मागील सात महिन्यांपासून ही मोहीम सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांचा भाग म्हणून ही कारवाई केली जात आहे.

मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, गर्दी न करणे, कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.

मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झालेले गुन्हे –

एमआयडीसी भोसरी (13), भोसरी (0), पिंपरी (30), चिंचवड (17), निगडी (9), आळंदी (33), चाकण (12), दिघी (1), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (11), वाकड (8), हिंजवडी (0), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (25), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.