Chinchwad crime News: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 196 जणांवर कारवाई

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. गुरुवारी (दि. 10) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 196 जणांवर कारवाई करत त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान लागू करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाची पोलीस अंमलबजावणी करीत आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे.

गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरात 1 हजार 219 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरातील आजवरचा कोरोना बधितांचा आकडा 59 हजार 966 वर पोहोचला आहे.

गुरुवारी पोलिसांनी केलेली कारवाई  

एमआयडीसी भोसरी (9), भोसरी (0), पिंपरी (10), चिंचवड (7), निगडी (8), आळंदी (0), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (31), वाकड (25), हिंजवडी (31), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (50), रावेत चौकी (6), शिरगाव चौकी (15)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.