Chinchwad Crime News : मास्क न वापरणाऱ्या 243 जणांवर सोमवारी कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मास्क वापरण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाला पायदळी तुडवून अजूनही नागरिक मास्क न वापरता बाहेर फिरत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मास्क न वापरणा-या 243 बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दोन हजार 221 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजवर शहरातील एक लाख 69 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी तीन हजार 36 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हा आकडा दररोज वाढत असून कोरोनाबाबत खबरदारी घेण्यास नागरिक अजूनही तयार नसल्याचे पोलीस करत असलेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

सोमवारी पोलिसांनी केलेली विनामास्कची कारवाई  

एमआयडीसी भोसरी (45), भोसरी (17), पिंपरी (02), चिंचवड (38), निगडी (13), आळंदी (16), चाकण (14), दिघी (11), सांगवी (14), वाकड (16), हिंजवडी (17), देहूरोड (00), तळेगाव दाभाडे (00), तळेगाव एमआयडीसी (07), चिखली (05), रावेत चौकी (11), शिरगाव चौकी (13), म्हाळुंगे चौकी (04)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.