Chinchwad Crime News : मास्क न वापरणाऱ्या 425 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – वारंवार आवाहन करूनही नागरिक प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करतात. शहरात मास्क वापरण्याच्या आदेशाचा भंग करणाऱ्या 425 जणांवर बुधवारी (दि. 17) पोलिसांनी कारवाई केली.

पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. तरीदेखील नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

बुधवारी पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे  

एमआयडीसी भोसरी (42), भोसरी (10), पिंपरी (15), चिंचवड (82), निगडी (30), आळंदी (12), चाकण (23), दिघी (29), सांगवी (14), वाकड (30), हिंजवडी (18), देहूरोड (14), तळेगाव दाभाडे (09), तळेगाव एमआयडीसी (03), चिखली (60), रावेत चौकी (10), शिरगाव चौकी (14), म्हाळुंगे चौकी (10)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.