Chinchwad Crime News : विकेंड लॉकडाऊनमध्ये विनामास्क फिरणाऱ्या 914 नागरिकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – विकेंड लॉकडाऊनमध्ये देखील नागरिक कोरोना साथ प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. शनिवार आणि रविवारी लागू असलेल्या विकेंड लॉकडाऊनमध्ये नियम तोडणाऱ्या तब्बल 914 नागरिकांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी 451 तर रविवारी (दि. 18) 463 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मृतांची संख्या वाढल्याने स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी ‘वेटींग’ आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाने संचारबंदी व विकेंड लॉकडाऊन करून कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. तरीदेखील अनेकजण विनामास्क फिरत असल्याने करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

रविवारी (दि. 18) पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (79), भोसरी (80), पिंपरी (04), चिंचवड (46), निगडी (49), आळंदी (14), चाकण (00), दिघी (14), सांगवी (16), वाकड (29), हिंजवडी (21), देहूरोड (18), तळेगाव दाभाडे (34), तळेगाव एमआयडीसी (01), चिखली (08), रावेत चौकी (49), शिरगाव चौकी (01), म्हाळुंगे चौकी (00)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.