Chinchwad crime News: टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 96 जणांवर कारवाई

प्रशासनाकडून रुग्णालयांच्या निर्मितीबरोबरच काळजी घेण्याचे, सुरक्षित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीची पोलिसांकडून अंमलबजावणी केली जात असून, टाळेबंदीचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी (दि. 31) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 96 जणांवर कारवाई केली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या अनलॉक चार मध्ये नागरिकांना टाळेबंदीतून ब-याच प्रमाणात सूट देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता कोणत्याही भागात नव्याने टाळेबंदी लावताना आता राज्य सरकारला केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबरोबर अनेक नियमांमधून नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे.

टाळेबंदीतून नागरिकांची काही प्रमाणात सुटका होत आहे. मात्र, कोरोनातून अजूनही सुटका झालेली नाही. कोरोनाचा विळखा अजूनही वाढतच आहे. शहरात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना बाधितांचे आकडे वाढत आहेत.

प्रशासनाकडून रुग्णालयांच्या निर्मितीबरोबरच काळजी घेण्याचे, सुरक्षित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (20), भोसरी (2), पिंपरी (12), चिंचवड (13), निगडी (2), आळंदी (1), चाकण (0), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (3), वाकड (12), हिंजवडी (6), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (23), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.