Chinchwad crime News : आदेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात प्रशासनाने दिलेले आदेश मोडणा-यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मंगळवारी (दि. 22) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील 135 जणांवर प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील 814 जणांचे कोरोना अहवाल मंगळवारी सकारात्मक आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 71 हजारांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी एकाच दिवशी 34 रुग्णांचा पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी शहरवासियांची चिंता वाढवणारी आहे.

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे केले आहे. मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणा-यांवर देखील कारवाई केली जात आहे.

मंगळवारी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (3), भोसरी (7), पिंपरी (20), चिंचवड (13), निगडी (6), आळंदी (10), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (18), वाकड (28), हिंजवडी (7), देहूरोड (8), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (13), रावेत चौकी (2), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.