Chinchwad Crime News : सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई; दारु, सिगारेट गुटख्यासह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – चिखली व हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीरपणे विक्री होत असलेली दारु, सिगारेट तसेच गुटखा सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून जप्त केला. या कारवाईत एकूण 9 लाख 35 हजार 45 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायमंड पान स्टोअर व भास्कर चाैधरी यांच्या कुदळवाडी येथील पत्र्याच्या गोडावूनमधून तंबाखूजन्य गुटखा साठा करून ठेवला असून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. 23 हजार 630 रुपयांची रोकड, पाच लाख 54 हजार 363 रुपयांचा गुटखा, 2 हजार 520 रुपयांचे सिगारेट, 30 हजार रुपयांचे दोन मोबाईल, 55 हजारांची दुचाकी असा एकूण सहा लाख 65 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच पुनाराम वोराराम सिरवी (वय 22, रा. शाहूनगर, चिखली) याच्यासह अन्य एका जणाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंजवडी फेज 3 येथे भोईरवाडी परिसरात विनापरवाना दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन, आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, 11 हजार 532 रुपये किमतीच्या विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या, असा एकूण दोन लाख 69 हजार 532 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, संदीप गवारी, पोलीस कर्मचारी अनंत यादव, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, महेश बारकुले, दीपक साबळे, विष्णू भारती, अमोल शिंदे, अनिल महाजन, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, मारोतराव जाधव, योगेश तिडके, वैष्णवी गावडे, सोनाली माने, योगिनी कचरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.