Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड शहरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी 72 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करणा-या 72 नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 27) गुन्हे दाखल केले.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दिलेल्या वेळेच्या मर्यादेपेक्षा अधिक वेळ दुकाने सुरु ठेवणे, गर्दी जमवणे अशा नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात 812 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. तर 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई 

एमआयडीसी भोसरी (0), भोसरी (1), पिंपरी (0), चिंचवड (14), निगडी (10), आळंदी (2), चाकण (0), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (8), वाकड (5), हिंजवडी (24), देहूरोड (4), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.