_MPC_DIR_MPU_III

chinchwad crime News: मद्यपी वाहन चालकांवर रक्त तपासणी करून होणार कारवाई; आठ रुग्णवाहिका तैनात

एमपीसी न्यूज – मद्य प्राशन करून वाहन चालवत असल्याचा पोलिसांना संशय आल्यास संबंधित वाहन चालकाची रक्ताची चाचणी करून त्यात अल्कोहोलचे प्रमाण तपासले जाणार आहे. रक्ताच्या तपासणीत जर अल्कोहोलचे प्रमाण आढळले, तर संबंधित वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आठ रुग्णवाहिका ठिकठिकाणी तैनात केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मद्यप्राशन करण्यास पसंती देतात. मद्यप्राशन करून वाहन चालवतात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालाविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे आढळल्यास संबंधित वाहन चालकांवर कारवाई केली जाते.

मात्र, काही वाहन चालक मद्य प्राशन करून वाहन चालवत असतानाही पोलिसांसोबत हुज्जत घालून आपण मद्य प्राशन केले नसल्याचे रेटून सांगतात. अशा वाहन चालकांवर वचक बसण्यासाठी तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरात प्रमुख ठिकाणी आठ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. संशयित वाहन चालकाची थेट रक्ताची तपासणी केली जाणार आहे. त्या तपासणीमध्ये जर रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळले तर त्या वाहन चालकावर कारवाई केली जाणार आहे.

अवैधरीत्या चालणा-या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आठ पथकांची नियुक्ती

शहर परिसरातील हॉटेल, ढाबे यांच्यावर चालणा-या बेकायदेशीर आणि त्रासदायक पार्ट्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आठ पथकांची नियुक्ती केली आहे. चार विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे प्रत्येक दोन पथके असणार आहेत.

ही पथके नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्रासदायक पार्ट्या शोधून त्यावर कारवाई करणार आहेत. रात्री 11 नंतर हॉटेल सुरु ठेवणे, स्पीकरचा आवाज मोठा करणे, तसेच नागरिकांना त्रास होईल, असे कृत्य करण्यावर ही पथके लक्ष ठेवून असणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.