Chinchwad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली महिलेसह तृतीयपंथियाकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली महिला आणि तृतीयपंथियाकडून वेश्या व्यवसाय करून घेणा-या एकाला अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने काळभोरनगर येथील एका स्पा सेंटरवर छापा मारून गुरुवारी (दि. 4) सायंकाळी ही कारवाई केली आहे.

दर्पण दिलीप कुमार (वय 32, रा. काळेवाडी, मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर काळभोर नगर येथे काव्यांजली स्पा सेंटर आहे. त्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.

त्यानुसार पथकाने खातरजमा करून स्पा सेंटरवर छापा मारला असता तिथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी एक महिला आणि एका तृतीयपंथियाची सुटका केली. आरोपी दर्पण आणि एक महिला हे दोघेजण सुटका केलेली महिला आणि तृतीयपंथियाकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.