Chinchwad Crime News : घराबाहेर झोपलेल्या दांपत्याला पहाटेच्या वेळी मारहाण; दागिनेही लुटले

एमपीसी न्यूज – घराबाहेर झोपलेल्या दांपत्याला मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 20) पहाटे काळभोरनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बाळकृष्ण मोहन मोरे (वय 38, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 21) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश किसन कुसाळकर (वय 27), पवण्या लष्करे (वय 25, दोघेही रा. रामनगर, चिंचवड) आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी हे घरात झोपले होते. तर त्यांचे आई-वडिल घराबाहेर झोपले होते. पहाटेच्या सुमारास चार आरोपी मोरे यांच्या घराबाहेर आले.

त्यांनी फिर्यादी यांच्या आई-वडिलांना मारहाण करून आईच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुमके, फुले अंगठी असे 35 हजारांचे दागिने व चार हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 39 हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.