Chinchwad Crime News : अवैध दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड परिसरात कारवाई करून 79 हजार 200 रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 2) दुपारी चापेकर चौक, चिंचवड येथे करण्यात आली.

दीपक काळुराम बागडे (वय 24, रा. डायमंड टेलर्स जवळ, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, सांगवी), आणि प्रथमेश वाईन्सचे मालक (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चापेकर चौक चिंचवड येथून अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी कारमधून दारू वाहून नेली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.

यात पोलिसांनी 69 हजार 200 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि 5 लाख 10 हजार रुपये किमतीची एक स्कॉर्पिओ चार जप्त केली आहे. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.