Chinchwad crime News : घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी करणा-या एका सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख 58 हजार 500 रुपयांचे आठ मोबईल फोन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

संदेश प्रभाकर पाटोळे (वय 22, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक वासुदेव मुंढे आणि पोलीस शिपाई सुखदेव गावंडे यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील एक आरोपी चोरीचे मोबईल फोन विकण्यासाठी डांगे चौकात येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी डांगे चौकात सापळा लावला.

संदेश एक दुचाकीवरून चोरी केलेले मोबईल विकण्यासाठी आला. पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने ती दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख 58 हजार 500 रुपये किमतीचे आठ मोबईल फोन आणि एक दुचाकी जप्त केली.

आरोपी संदेश याने सात मोबईल फोन म्हाळुंगे परिसरात राहणा-या कामगार वसाहतीतून चोरी केले आहेत. तर एक मोबईल त्याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून निगडी येथून रस्त्याने पायी चालत जार असलेल्या एका व्यक्तीचा चोरला आहे.

या कारवाईमुळे म्हाळुंगे पोलीस चौकीतील तीन, चिखली आणि चाकण पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी संदेश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले. तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, घनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.