Chinchwad Crime News : अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या व्यावसायीकाला अटक

एमपीसी न्यूज –  तरुणीचा पाठलाग करणे, तिला मॅसेज करून त्रास देणे तर गॅलरीत बसून तरुणीकडे बघत अश्लील हावभाव कऱणाऱ्या व्यावसायीकाला चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Crime News) अटक केली आहे.

गजानन कुशाबा राठोड (वय 40 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय पीडित तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pimpri News : शस्त्रावरील नियंत्रणासाठी पुणे पोलिसांच्या धोरणाचा आधी अभ्यास करु –  विनयकुमार चौबे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी हा मागील सहा महीन्यांपासून त्रास देत होता. सतत मॅसेज करणे, पाठलाग करणे हे सुरुच होते. गुरुवारी (दि.2) तो त्याच्या गॅलरीत बसला होता. फिर्यादी यांना पहाताच त्याने अश्लिल हावभाव करत फिर्यादीच्या मनास लज्जा (Chinchwad Crime News) उत्पन्न केली. यावरून चिचंवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.