Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड शहरात 155 जणांवर खटले दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 21) एका दिवसात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 155 जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाचे नागरिकांकडून अजूनही पालन केले जात नाही. कारवाईच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.

कोरोनाची साथ सुरु होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या काळात टाळेबंदी जाहीर करून ती शिथिल देखील करण्यात आली. मात्र, काही नागरिकांनी टाळेबंदी आणि कोरोनाला गांभीर्याने घेतले नाही.

ही बाब कोरोनाची साथ पसरण्यासाठी पोषक ठरणारी आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (8), भोसरी (3), पिंपरी (41), चिंचवड (7), निगडी (7), आळंदी (0), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (12), वाकड (29), हिंजवडी (13), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली (20), रावेत चौकी (4), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.