Chinchwad Crime News : मास्क न वापरणाऱ्या 245 बेजबाबदार नागरिकांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. मंगळवारी (दि. 27) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विनामास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या 245 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

शहरातील करोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

मंगळवारी पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (12), भोसरी (11), पिंपरी (14), चिंचवड (29), निगडी (20), आळंदी (11), चाकण (14), दिघी (09), सांगवी (09), वाकड (16), हिंजवडी (12), देहूरोड (17), तळेगाव दाभाडे (08), तळेगाव एमआयडीसी (03) चिखली (19), रावेत चौकी (02), शिरगाव चौकी (39), म्हाळुंगे चौकी (00)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.