Chinchwad Crime News : अवैधरीत्या वाळू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – अवैधरीत्या वाळू विक्री करणा-या दोघांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 13) सकाळी वाल्हेकरवाडी येथे करण्यात आली.

ऋषिकेश अनिल चव्हाण (वय 21, रा. वाघोली. मूळ रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर), राजू परमेश्वर खोत (वय 33, रा. वाघोली, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील पृथ्वी शौर्य निर्मिती (ई) प्रा. ली. सोसायटीच्या मोकळ्या जागेत दोघेजण बेकायदेशीरपणे वाळू विक्री करत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, एमएच 14 / एएस 8510 या ट्रकमधून तीन लाख 77 हजार रुपयांची वाळू विनापरवाना चोरी करून विकली जात असल्याचे सामोर आले.

पोलिसांनी ट्रक मालक ऋषिकेश आणि ट्रक चालक राजू या दोघांना अटक केली. या दोघांनी वाळू सप्लायर रोहित कराळे (वय 30, रा. काळेवाडी, वाकड) याच्या सांगण्यावरून ही वाळू चिंचवड येथे विक्रीसाठी आणली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.