Chinchwad Crime News : वेफर्स खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – वेफर्स विकणा-या व्यावसायिकाकडून वेफर्स खरेदी करण्याचा बहाणा करून त्याला थांबवले. व्यावसायिकाकडे असलेले सुट्टे पैसे घेऊन त्याबदल्यात दोन हजारांच्या नोटा देतो, असे सांगून 24 हजार रुपयांचे सुट्टे पैसे घेऊन बोलण्यात गुंतवून अनोळखी व्यक्ती निघून गेला.

ही घटना रविवारी (दि. 14) दुपारी एक वाजता लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

दिगंबर नामदेव मुडबे (वय 25, रा. काळेवाडी विजयनगर, मूळ रा. कर्नाटक) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वेफर्सची दुकानांमध्ये डिलिव्हरी देण्याचे काम करतात. रविवारी सकाळी त्यांनी ओम इंटरप्रायजेस येथून वेफर्स घेतले आणि चिंचवड परिसरातील दुकानांमध्ये डिलिव्हरी दिली. त्यानंतर ते दुपारी एक वाजताच्या सुमारास लिंक रोडवरील आशापुरा मार्केट येथे आले असता एका अनोळखी व्यक्तींना त्यांना थांबवले.

फिर्यादी यांच्याकडील माल खरेदी करण्याचा बहाणा करून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांच्याकडील सुट्टे पैसे घेऊन त्याबदल्यात दोन हजारांच्या नोटा देतो असे सांगून सुट्टे 24 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून अनोळखी व्यक्ती 24 हजार रुपये घेऊन निघून गेला. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1