Chinchwad Crime News : नगरसेविकेच्या मुलाने स्वतःवर झाडली गोळी, उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री चिंचवड गावात घडली. प्रसन्न चिंचवडे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसन्न याने त्याच्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. हा प्रकार रविवारी रात्री घडली. प्रसन्ना याला तात्काळ उपचारासाठी थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी पहाटे काळेवाडी येथील समशान भूमी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. जखमी प्रसन्न हा नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.