Chinchwad crime News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलगा व सुनेवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांचा सांभाळ केला नाही. याबाबत मुलगा आणि सुनेवर ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण कायदा कलम 24, भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन जगन्नाथ गीते (वय 41), प्रियंका सचिन गीते (वय 36, रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलगा आणि सुनेचे नाव आहे. याबाबत जगन्नाथ सोनुती गीते (वय 75) यांनी शुक्रवारी (दि. 16) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गीते यांचा मुलगा सचिन आणि सून प्रियंका यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे सन 2016 पासून पालन पोषण केले नाही.

तसेच दरम्यानच्या कालावधीत मुलगा आणि सुनेने वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिली. मुलगा सचिन याने वडिलांना लाकडी बांबूने मारहाण केली. आई-वडिलांचा छळ केल्याची फिर्यादी वडिलांनी नोंदवली आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.