Chinchwad crime News : अवैधरित्या दारू विक्री सुरु असलेल्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

एमपीसी न्यूज – अवैधरित्या दारू विक्री सुरु असलेल्या हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. त्यामध्ये रोख रक्कम, विदेशी दारू, बिअर आणि मोबाईल फोन, असा एकूण 85 हजार 355 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) सायंकाळी साडेसात वाजता वाल्हेकरवाडी येथील चंद्रमा हॉटेल येथे करण्यात आली.

हॉटेल मालक सुदर्शन दयानंद किनीकर (रा. वाकड), आश्विन विनयकुमार चौबे (रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रावेतकडून वाल्हेकरवाडीकडे जाणा-या रस्त्यावर चंद्रमा हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या दारू विक्री सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार एका पथकाने गुरुवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला.

त्यावेळी हॉटेल मालक सुदर्शन आणि मॅनेजर आश्विन यांनी हॉटेलमध्ये पाच ते सहा जणांना एकत्र बसवून विदेशी दारू, बिअरची विक्री करत असल्याचे दिसले.

पोलिसांनी हॉटेल मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून 15 हजार 605 रुपये रोख रक्कम, 47 हजार 250 रुपयांची विदेशी दारू आणि बिअर, 22 हजार 500 रुपयांचे तीन मोबाईल फोन असा एकूण 85 हजार 355 रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी संतोष असवले, संदीप गवारी, शशिकांत पवार, भगवंता मुठे, दत्तात्रय गोरे, दीपक साबळे, गणेश कारोटे, योगेश तिडके, विष्णू भारती यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.