Chinchwad Crime News : वाल्हेकरवाडीत सोसायटीच्या पार्किंगमधून देशी-विदेशी दारूसाठा  जप्त

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमधून पोलिसांनी 30 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली.   तसेच चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक कार आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि. 6) रात्री केली.

दादासाहेब भीमराव चोपडे (वय 42, रा. बिजलीनगर, चिंचवड) आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये  एका कारमध्ये दारूसाठा असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी एक हजार 80 रुपये रोख रक्कम, 30 हजार 120 रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि सात लाख रुपये किमतीची एक ब्रेजा कार (एम एच 14 / जे ए 3092) असा एकूण सात लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी लॉकडाऊनच्या कालावधीत बेकायदेशीरपणे दारू विकत होते. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.