Chinchwad Crime News : खोटे हिशोब तयार करून साडे सात लाखांचा अपहार; अकाउंटंट विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – खोटे हिशोब तयार करून कंपनीचा सात लाख 37 हजार 70 रुपयांचा अपहार करणाऱ्या अकाउंटंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेतानंद मोहन हाडमोडे (वय 38, रा. अंकुश चौक, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या अकाउंटचे नाव आहे. याबाबत विजय चांगदेव शिरसाठ (वय 38, रा. पिंपळे गुरव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 14 जानेवारी 2020 ते 25 सप्टेंबर 2020 या कालावधीत लक्ष्मी कॉम्प्लेक्स, चिंचवड येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डेटा केअर कॉर्पोरेशन या कंपनीच्या चिंचवड येथील शाखेत अकाउंटंट म्हणून नोकरीस होता. अकाउंटंट म्हणून नोकरी करत असताना बिलाचे सर्व काम पाहणे ही आरोपीची जबाबदारी होती.

ग्राहकांनी वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूचे बिल त्यांना देऊन बिलाचे पैसे कंपनीकडे जमा न करता स्वतःकडे ठेवून आरोपीने कंपनीच्या संगणकातील सिस्टीममध्ये ती रक्कम आऊटस्टँडिंग दाखवली. नवीन ग्राहकाने वस्तू घेतल्यास पूर्वीचे बिल क्लोज करून नवीन बिल आऊटस्टँडिंग दाखवले.

अशा प्रकारे खोटे हिशोब तयार करून कंपनीचा सात लाख 37 हजार 70 रुपयांचा अपहार केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.