Chinchwad crime News : चॅसी बदलून ते विकायचे महागड्या गाड्या; मास्टरमाईंडला गुन्हे शाखा युनिट एकने फिल्मी स्टाईलने पकडले

1 कोटी 39 लाखांच्या 13 कार जप्त

एमपीसी न्यूज – गॅरेज चालवणारा एकजण काही साथीदारांच्या मदतीने वाहनचोरी करायचा. चोरलेल्या वाहनांना जुन्या खरेदी केलेल्या वाहनांचे चासिस बसवायचे आणि त्या कार मनमानी किमतीला विकायच्या. अशा प्रकारे कार चोरी, विक्री करणाऱ्या मास्टरमाईंडला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले.

मनजीत जोगिंदरसिंग मारवा (रा. चिंचवड. मूळ रा. नवी दिल्ली), दीपक चमनलाल खन्ना (वय 40, रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक केलेल्या मास्टरमाईंडकडून 13 महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन टोल नाक्यावर सापळा लावला.

याची खबर आरोपीला मिळाली. त्याने त्याच्या साथीदारासोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला फिल्मी स्टाईलने तब्बल 30 किलोमीटर पाठलाग करून पकडले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.