Chinchwad Crime News : दिघी, चाकण, पिंपरी मधून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – दिघी आणि चाकणमधून प्रत्येक एक तर पिंपरी मधून तीन अशा एकूण पाच दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत शनिवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिघी पोलीस ठाण्यात अनिलकुमार तारकेश्वर राय (वय 30, रा. देहूफाटा, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. राय यांची 15 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ बी 1889) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

चाकण पोलीस ठाण्यात श्रीराम आश्राजी डोंगरे (वय 39, रा. पाटील नगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. डोंगरे यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी व्ही 4227) अज्ञात चोरट्यांनी म्हाळूंगे येथील ऑटोकॉम कार्पोरेशन पानसे कंपनीच्या बाहेरून चोरून नेली.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात कृष्णा रामचंद्र कदम (वय 60, रा. समर्थनगर, दिघी) यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 12 / डी एन 4823) पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या बाहेरुन चोरट्यांनी चोरून नेली.

दुसऱ्या गुन्ह्यात महेश अमृतलाल कनोजिया (वय 22, रा. पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली असून त्यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी आर 1887) चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

तिसऱ्या गुन्ह्यात प्रशांत नागनाथ इंगळे (वय 31, रा. दत्तनगर निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. इंगळे यांची 50 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ वाय 0122) अज्ञात चोरट्यांनी टाटा मोटर्सच्या मेन गेट समोरील पार्किंगमधून चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.