Chinchwad Crime News : चाकण, आळंदी, तळेगाव, चिखली परिसरातून पाच वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातून दोन, आळंदी, तळेगाव दाभाडे, चिखली परिसरातून प्रत्येकी एक अशी एकूण पाच वाहने चोरीला गेली आहेत. याबाबत सोमवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रकाश नारायण बो-हाडे (वय 40, रा. आंबेठाण) आणि गुटू अंबादास राठोड (वय 30, रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बो-हाडे यांची 25 हजारांची तर राठोड यांची 1 लाख 10 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

चेतन राजाराम लोखंडे (वय 30, रा. मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडे यांची 20 हजारांची दुचाकी घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमधून चोरून नेली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

इरफान इसाक बागवान (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांची 20 हजारांची मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदे जवळून चोरून नेली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

ज्ञानेश्वर काशिनाथ लोंढे (वय 30, रा. मोरेवस्ती, चिखली) यांची 20 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी स्पाईनरोड, चिखली येथून चोरून नेली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.