Chinchwad crime News : पिंपरी, चाकण, तळेगावमधून पाच वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी, चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातून पाच वाहने चोरीला गेली आहेत. याबाबत रविवारी (दि. 11) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात गोपालराव व्यंकटेश गुरीदांपल्ली (वय 46, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 10 हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एम एच 12 / ए व्ही 3083) अज्ञात चोरट्यांनी संत तुकाराम नगर येथील कामठे चौकातून चोरून नेली.

केविन आरूलराज सायमन (वय 25, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांची 80 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / एच एक्स 2343) त्यांच्या घराच्या समोरून चोरून नेली आहे. तर दिलीप दामू पाटील (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांची 50 हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एम एच 14 / एच वाय 4260) घराच्या समोरून चोरून नेल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

संजीवकुमार सीताराम सिंग (वय 30, रा. झीत्राईमळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग यांची देखील 30 हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एम एच 14 / एच बी 2357) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.

रमाकांत राजेंद्र ढोरे (वय 23, रा. मावळ. मूळ रा. छत्तीसगड) यांची दुचाकी (एम एच 14 / जे सी 4696) चोरट्यांनी इंदोरी गावातून चोरून नेली आहे. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.